संपादकीय – मे २०१६

DACमराठी माणसांसाठी पार्ल्यासारखे दुसरे ठिकाण निदान मुंबईत तरी नाही हे नक्की. काय नाही आपल्या पार्ल्यात ? शिक्षणाच्या भरपूर सोयी, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, सुरक्षित वातावरण, उत्तम भाजीपाला, विविध प्रकारचे eating joints!

अनेक कलाकारांचे वास्तव्य असलेला पार्लेकर समाज संवेदनशील असावा अशी अपेक्षा ठेवली तर ते नक्कीच गैर ठरणार नाही. आज महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. मराठवाड्यातली परिस्थिती तर फारच गंभीर आहे. नद्या, धरणे कोरडी पडली आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नहियेत. हजारो कुटुंब उध्वस्त होत आहेत, विस्थापित होत आहेत. संपूर्ण देशातूनच नव्हे तर जगातून मदतीचा ओघ मराठवाड्याकडे वाहत आहे. ह्या सगळ्याशी आपले काहीच देणेघेणे नाही का ? कुठे गेली आपली संवेदनशीलता ?

‘ह्यात आपण काय करणार ? त्यांची पाण्याची गरज आपण येथे पाणी वाचवून थोडीच भागणार आहे ?’ असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण मित्रांनो, करण्यासारखे बरेच आहे. पार्ल्यात स्वतःला ‘सामाजिक’ म्हणवून घेणाऱ्या अनेक संस्था आहेत. मनोरंजनाचे व पुरस्कार वितरणाचे चकचकीत कार्यक्रम करणारेसुद्धा भरपूर आहेत. का नाही ह्यातून थोडी मदत मराठवाड्याकडे जाऊ शकत ? खरे म्हणजे संपूर्ण पार्ल्यातर्फे एक घसघशीत मदत दुष्काळग्रस्तांसाठी गेली पाहिजे. काही महिन्यांपूर्वीच “सोबती’संस्थेतर्फे मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळनिधीसाठी धनादेश देण्यात आला. पार्ल्यातीलच मंगलाताई भागवत फौंडेशन जिल्ह्यातील पाच गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवत आहे. पण इतर संस्था मात्र थंड दिसत आहेत. का ?

अगदी मराठवाड्यापर्यंत जायला जमले नाही तरी मुंबईच्या आजूबाजूलासुद्धा अशा अनेक वस्त्या, गावे आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे. पार्ल्यातील संस्थांनी केवळ मनोरंजनाच्या कार्यक्रमात मश्गुल राहण्यापेक्षा अशा कार्यातही रस घ्यावा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s