मे महिन्याचे ‘अस्सल पार्लेकर’ विजेत्यांची नावे आण‍ि प्रश्नांची उत्तरे

मधुरा बर्वे, अमेय शेटे, भाग्यश्री महाजन, सतीश गोडबोले, मंगलाताई जोशी, अलका गोडबोले, वेद बर्वे

मे महिन्याच्या प्रश्नांची उत्तरे

1.            विलेपार्लेस्थानक किती साली बांधण्यात आले? – 1907

सध्या ज्या भागात दीनानाथ नाटयगृह आहे तेथे शेठ गोवर्धनदास तेजपाल यांचा मोठा बंगला होता. या जमिनीलगतच रेल्वेमार्ग होता पण स्टेशन नव्हते. या बंगल्याच्या बांधकामाचे सामान आणण्यासाठी तेजपाल यांनी स्टेशन मंजूर करून घेतले.  त्यासाठी त्यांनी आपली काही जमीन आणि  व त्यानंतर तेथे गाडया थांबण्याची व्यवस्था झाली.

2.            पार्ल्यामधील कोणती हाउसिंग सोसायटी कराचीमधील विस्थापितांनी बांधली?- साधना सोसायटी

स्वातंत्र्यपूर्व काळात बरेच मराठी भाषिक सिंध प्रांतात राहत होते. फाळणीमुळे अनेकांना कराची सोडून भारतात यावे लागले. त्यांच्यापैकी काही लोकांनी 1960 साली पार्ल्यात तेजपाल स्कीम परिसरात साधना हाऊसिंग सोसायटी स्थापन केली.

3.            रामकृष्ण हॉटेलचं जुनं नाव काय? – मद्रास कॅफे

विलेपारले स्थानकाच्या समोर असलेले रामकृष्ण हॉटेल हे खवय्यांच्या विशेष आवडीचे ठिकाण. पार्ल्यातील ज्येष्ठांच्या जीभेवर मद्रास कॅफे या मूळ हॉटेलमधील कॉफीची चव आजही रेंगाळते.

4.            खालीलपैकी कुठला राष्ट्रीय नेता टिळक मंदिरात आलेला नाही?-डॉ.राजेंद्रप्रसाद

1923 साली स्थापन झालेली ‘लोकमान्य सेवा संघ पारले’ ही पार्ल्यातील अग्रगण्य सामाजिक संस्था. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या संस्थेला आजवर भेट दिली आहे. या मध्ये जवळपास सर्व पुढाऱ्यांचा समावेश आहे मात्र डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या नावाची नोंद आढळत नाही.

5.            कुठल्या पार्लेकर नाटयकलावंताने नगरसेवकाचे पद भूषविले होते?- नंदा पातकर

नंदा पातकर हे पार्ल्यातील एक सुप्रसिध्द नाटयकलावंत. ‘साक्षीदार’, ‘तो मी नव्हेच’ या नाटकांमधील त्यांच्या भूमीका  गाजल्या. 1950 सालच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतलेले नंदा पातकर हे 1957 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर ते विलेपार्ल्याचे नगरसेवक झाले.

6.            पार्ल्यातील पहिली रिक्षा कोणाची होती?- बंडू पातकर

1952 च्या सुमारास टिळक मंदिराच्या शेजारी राहणाऱ्या बंडू पातकर यांनी पार्ल्यात प्रथम रिक्षा सुरू केली. तिचा नंबर होता ‘ बी एम आर 43. क्रीडापटू म्हणून नावाजलेले बंडू पातकर हे पुढे त्यांच्या धार्मिक श्रध्देमुळे आणि त्यांनी घेतलेल्या दत्तसंप्रदायाच्या अनुग्रहामुळे अनेकांच्या आठवणीत आहेत.

7.            पार्ल्यातील कामाठीवाडी परिसरात वाढलेला हिंदी सिनेसृष्टीतला  सुप्रसिध्द संगीतकार कोण?- लक्ष्मीकांत

हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत कुडाळकर यांचे बालपण पार्ल्यातील कामाठीवाडी परिसरात गेले. पारसमणी या चित्रपटापासून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर दोस्ती, मिलन, सत्यम शिवम सुंदरम, एक दुजे के लिये, हीरो अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी मधूर गाणी संगीतबध्द केली. पुढे पार्लेपश्चिम येथील ‘पारसमणी’ बंगल्यामध्ये त्यांचे वास्तव्य होते.

8.            पार्लेश्वर मंदिरामधली भव्य गणेशमूर्ती घडवणाऱ्या पार्लेकर कलावंताचे नाव काय?- विठ्ठल शानभाग

1986 साली पार्लेश्वर मंदिराशेजारी गणपती मंदिराची स्थापना झाली. पार्ल्यातील ज्येष्ठ शिल्पकार विठ्ठल शानभाग यांनी बॉन्झमधील ही मूर्ती घडवली. भायखळा येथील जिजामाता उद्यानातील 7 फुटी जिजामाता व बाल शिवाजीचे शिल्प, वरळी येथील बुध्दविहारातील बुध्दाचा पुतळा, टाटा हॉस्पिटल मधील नर्गीस दत्त अशी अनेक उत्तम शिल्पे त्यांनी घडवली आहेत.

9.            आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना खेळलेला पार्लेकर खेळाडू कोण?- अजित पै

अजित पै हे वयाच्या 14 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंत ‘विलेपारले रिक्रिएशन क्लब’साठी भाऊ अरू पै यांच्या जोडीने टेनिस बॉल क्रिकेट खेळले. त्यांचे वडिल मनोहर पै हे देखील प्रभावी जलदगती गोलंदाज होते. कांगा लीग, रणजी करंडक, दुलीप करंडक खेळलेले अजित पै हे 1969 मध्ये मुंबई येथे भारत विरुध्द न्युझिलंड कसोटी खेळले.

10.          शमी वृक्षाचे झाड पार्ल्यात कुठल्या रस्त्यावर आहे? – हनुमान मार्ग व रामभाऊ बर्वेमार्ग जंक्शन (पितळेवाडी)

धार्मिक व पौराणिक महत्त्व असलेल्या या झाडाच्या फांद्या नेहमी खाली झुकलेल्या असतात आणि त्याला चिचेसारखी बारीक संयुक्त पाने असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s