पुलंच्‍या साहित्याचे स्वामित्व हक्क

पुलंच्या “गोळाबेरीज’ ह्या पुस्तकावर आधारित “चांदी’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबवावे यासाठी श्री.शेखर नाईक व टिळक मंदिर यांनी पुण्याच्या सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने दावा फेटाळल्यावर त्यांनी हायकोर्टात अपील केले पण तेथेही कोर्टाने त्यांचे म्हणणे धुडकावून लावले. ह्याचे तीव्र पडसाद टिळक मंदिराच्या कार्यकारणीत उमटले आहेत. सोळा जणांच्या ह्या मंडळामधील तब्बल नऊ जणांनी संघ व्यवस्थापनाला लिहिलेल्या एका पत्राद्वारे ह्या गोष्टीबद्दल नापसंती व्यक्त करत आपला ह्याच्याशी काही संबंध नसून आपण ह्याचा निषेध करत आहोत असे म्हटले आहे. सदर पत्रात न्यायालयीन प्रक्रियेचे संक्षिप्त विवरण असून असे म्हटले आहे की विलीनि‍करणाचा मसुदा संस्थेकडे असल्याचा प्रत्यक्ष उपलब्ध पुरावा नाही. तो जर धर्मादाय आयुक्तांकडे असेल तर तो आजपर्यंत मिळविण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. आपल्याकडे असलेल्या अपुर्‍या कागदपत्रांच्या पुष्ट्यर्थ पु.ल.फाउंडेशनशी संबंधित कोणी आपल्या बाजूचे उभे राहिल ही शक्यता फारच धूसर दिसते. ह्या सर्व गोष्टींची गोळाबेरीज करायची झाल्यास संस्थेने त्याच्यातून काहीच साधले नाही परंतु संस्थेच्या 89 वर्षे स्वच्छ सार्वजनिक प्रतिमेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले. श्री. शेखर नाईक व श्री. कपाडिया यांचे पैसे परत करण्याच्या नामुष्कीची दाट शक्यता आहे. पत्रात पुढे असेही नमूद केले आहे की ह्या केस संदर्भात आम्हाला अंधारात ठेवल्यामुळे घडलेल्या घटनांशी आमचा संबंध नाही. आम्ही तुमच्या पुन्हा एकदा निदर्शनास आणू इच्छितो की, मुं‍बई उच्च न्यायालयाने पुणे जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध श्री. शेखर नाईक यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे या केससंबंधी दिला एवढा मनस्ताप खूप झाला. आता हे प्रकरण इथेच थांबवा. यापुढे या खटल्यासंबंधी पुढे जाण्यास आमचा खालील कार्यकारी मंडळ सदस्यांचा विरोध आहे. सध्याच्या परिस्थितीससुद्धा कार्यवाहच जबाबदार आहेत व हा खटला यापुढे सुद्धा कार्यवाहांनी पुढे नेल्यास येणार्‍या परिणामांस सर्वस्वी संघकार्यवाह जबाबदार असतील.

ह्या पत्रामध्ये खालील सदस्यांची नावे आहेत : श्री. श्रीकांत बापट, श्री. अनिल कोपरकर, श्रीमती मंगला जोशी, श्री. प्रभाकर ठोसर, श्री. आलोक हर्डीकर, श्रीमती वसुधा पंडित, श्री. प्रकाश रानडे, श्रीमती नीला रविंद्र, श्रीमती लीना बर्वे.

या संबंधी सह-कार्यवाह श्री.मोहन करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. संघाचे दुसरे सह-कार्यवाह प्रसाद कुलकर्णी ह्यांनीसुद्धा एका पत्राद्वारे “हा विषय संघाच्या २४ जून रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत मांडावा व चर्चेअंतीच निर्णय घ्यावा’ असे म्हटले आहे.

ह्या घटनाक्रमाने सर्वच पार्लेकर व्यथित झाले असून आमची टिळक मंदिराला अशी कळकळीची विनंती आहे कि वैद्यकीय बाबतीत आपण जसे सेकण्ड ओपिनीयन घेतो, तसे ह्याही बाबतीत पार्ल्यातील काही ज्येष्ठ व्यक्तींना, कलाकारांना, वकिलांना तसेच पुलंच्या नातेवाईकांना बोलावून त्यांचे मत विचारात घ्यावे. ह्या अनावश्यक कोर्टबाजीमुळे टिळक मंदिराबरोबरच पार्ल्याचीसुद्धा सर्वत्र नाचक्की होत आहे ह्याचे भान ठेवणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s