संपादकीय नोव्हेंबर २०१९

_mg_0080नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे नजर टाकली तर मुंबई वर भाजप -सेना युतीचेच वर्चस्व असल्याचे दिसून येते. अनेक वर्षांपासून ह्या आर्थिक महानगरीवर युतीचाच प्रभाव आहे, येथील महानगर पालिकेत शिवसेनेचाच महापौर आहे, त्यामुळे विधान सभेच्या निवडणुकीत जनतेने युतीच्या बाजुने कौल देणे अपेक्षितच होते. संपूर्ण राज्याचा विचार केला तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ह्यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला जास्त जागा मिळाल्या. ही निवडणूक एकतर्फी होईल असे अनेक राजकिय विश्लेषकांना वाटले होते पण तशी ती झाली नाही. एका अर्थाने राज्यातील जनतेने युतीला पसंती तर दिली पण त्याच बरोबर ‘सर्व काही आलबेल नाहीये’ असा संदेशही दिला आहे.

पाल्र्यापुरते बघायला गेले तर विद्यमान आमदार पराग अळवणी ह्यांना ह्या निवडणुकीत तुल्यबळ  प्रितस्पर्धीच नव्हता. त्याच बरोबर त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेली कामे, विधानसभेतील कामकाजात असलेला त्यांचा सिक्रय सहभाग, पाल्र्यातील हिंदुत्ववादी वातावरण, भाजपाचा बोलबाला, अळवणी यांचे सुसंस्कृत व्यिक्तमत्व, ह्या सर्व गोष्टींचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. विधानसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या विजयाबद्दल पराग अळवणी ह्यांचे मनःपूर्वक अिभनंदन.

1995 साली जेव्हा राज्यात प्रथम युतीचे सरकार आले होते तेव्हा डॉ रमेश प्रभू ह्यांना व पर्यायाने पाल्र्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा अनेकांना होती. त्यावेळी हुकलेली संधी ह्यावेळी अळवणी ह्यांना मिळेल, पाल्र्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा / अपेक्षा आज पार्लेकर करत आहेत.

पराग अळवणी जरी भरघोस मतांनी जिंकले असले तरी पाल्र्यातील सर्व नागरी प्रश्न सुटले असे मात्र नाही. रस्त्यांची खराब स्थिती, वाहतुकीचा मुरंबा, फेरीवाल्यांचा प्रश्न, बेकायदेशीर पार्किंग, पुनिर्वकासातील अडचणी, असे अनेक प्रश्न आजही पाल्र्याला भेडसावत आहेत. अळवणी ह्यात लक्ष घालतील व ते सोडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करतील ह्याच अपेक्षेने पार्लेकरांनी त्यांना पुन्हा निवडून दिले आहे. पुढील वाटचालीसाठी अळवणी ह्यांना अनेक शुभेछा !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s