संपादकीय ऑक्टोबर २०१९

_mg_0080विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. २१ तारखेला मतदान आणि २४ तारखेला निकाल. कोणाला मिळणार जनतेचा कौल ?  कोण होणार पुढला मुख्यमंत्री ?ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायला आपल्याला २४ तारखेपर्यंत वाट बघायला लागेल.

भाजपच्या ‘इनकमिंग’ मुळे गोंधळून गेलेले विरोधी पक्ष आज अस्तित्वाची लढाई लढत आहेत. त्यामानाने भाजप व सेनेची तयारी जोरात आहे असे चित्र आज तरी आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीचे गणित जमले आहे पण भाजपा-सेनेची ‘युती’ होणार की नाही हा आजच्या घडीचा सर्वात कळीचा मुद्दा बनला आहे. जर युती केली नाही तर भाजप स्वबळावर सत्ता टिकऊ शकतो का ह्या अंदाजावर युतीचे भविष्य ठरेल असे वाटते. अर्थात हा पेपर वाचकांपर्यंत पोहोचेपर्यंत चित्र नक्कीच स्पष्ट झाले असेल.

विलेपार्ले विधानसभा क्षेत्र पारंपारिकपणे हिंदुत्ववाद्यांचेच मानले जाते. कृष्णा हेगडे ह्यांचा अपवाद वगळता पार्लेकरांनी प्रत्येक वेळेस सेना-भाजपच्याच पारड्यात आपली मते टाकली आहेत. जर युती झाली आणि जर पार्ल्याची जागा भाजपाकडे आली तर विद्यमान आमदार पराग अळवणी यांचे पारडे सध्यातरी जड वाटते पण जर युती झाली नाही तर राज्यस्तरावर आणि पार्ल्यातही भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक एकत्र येऊ शकतात.

मुंबईची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणवून घेणाऱ्या आपल्या पार्ल्याला आज अनेक समस्यांनी घेरले आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीचा मुरंबा हे प्रश्न अनेक वर्षे आपल्याला सतावत आहेत. पार्ल्याचा पुढील आमदार सभ्य व सुशिक्षित असावा आणि त्याने पार्ल्याच्या नागरी प्रश्नांकडे जातीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा  नागरिकांनी केली तर त्यात काय चूक ?

अनेक सहनिवासांचे पुनर्विकासाचे गाडे रखडलेले आहे. फनेलझोनमध्ये येणार्‍या इमारतींचा प्रश्न अधिकच बिकट आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s