संपादकीय सप्टेंबर २०१९

_mg_0080नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या उपनगरीय पुनर्विकास परिषदेत ह्या विषयाशी निगडित अनेक मुद्द्यांवर उहापोह झाला. विविध तज्ज्ञांनी त्यांची मते, विचार मांडले. पार्लेकरांनी तर या परिषदेला उत्तम प्रतिसाद दिलाच पण इतर उपनगरांतूनही अनेक प्रतिनिधी ह्या परिषदेला हजर राहिले. ह्यावरूनच ‘पुनर्विकास’ हा विषय पार्लेकरांसाठी व एकूणच उपनगरवासियांसाठी किती महत्वाचा आहे हे लक्षात यावे.

जुन्या झालेल्या, मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी व्हावी ह्याविषयी कोणाचे दुमत होण्याचे कारण नाही. ह्या विषयातील प्रशासनाचे नियम, कायदेशीर बाजू,स्वयं पुनर्विकासाचा पर्याय ह्यासारखे अनेक महत्वाचे विषय ह्या परिषदेत चर्चिले गेले. पार्ल्यातील काही भाग हा ‘फनेल झोन’ मध्ये येत असल्याने तेथील इमारतींच्या उंचीवर बंधने आहेत. मग त्या इमारतींची पुनर्बाधणी कशी होणार ? विकासक अश्या प्रकल्पात हात घालत नसतील तर दुसरा काही मार्ग आहे का ? सरकार किंवा प्रशासन ह्याबाबतीत काय मदत करू शकते ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ह्या निमित्ताने झाला.

आपण जेव्हा ‘पुनर्विकास’ म्हणतो तेव्हा आपल्याला आपल्या इमारतीचा किंवा सहनिवासाचा पुनर्विकास अभिप्रेत असतो. पण आपण राहतो त्या परिसराचे काय ? त्याच्याबद्दल कोण विचार करणार ? शहराचा किंवा उपनगराचा आराखडा विकसित करताना अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. शाळा, उद्याने, मैदाने, अश्या अनेक गोष्टींचा अंतर्भाव ह्या आराखड्यात करावा लागतो. पार्किंग, कचरा नियोजन, पाणी पुरवठा, वाहतूक नियंत्रण ह्यांचासुद्धा विचार आराखड्यात करणे अभिप्रेत आहे. त्यामुळे आपल्या इमारतींबरोबरच आपला परिसर, आपले उपनगरसुद्धा राहाण्यायोग्य, स्वच्छ व सुंदर व्हावे अशी भूमिका आपण घेतली पाहिजे. हे झाले तरच आपले पार्ले हे एक ‘मॉडेल उपनगर’ होऊ शकते, खरे ना !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s