संपादकीय जुलै २०१९

_mg_0080दहावीचा निकाल म्हणजे अजूनही छातीत धडकी भरते, पोटात गोळा येतो. मार्क  मिळतील ह्यापेक्षा घरचे काय म्हणतील,  किती रागावतील ह्याचीच चिंता जास्त होती. निकालाच्या आधी सिनेमा, ट्रिप्स, नवीन कपडे, सर्व करून घ्यायला पाहिजे असा एक बेरकी विचार सुद्धा मनात येऊन जायचा. निकालानंतर आपले काही खरे नाही ह्याची जवळ जवळ खात्रीच आम्हाला होती. असे असूनही चेहेऱ्यावरचा आत्मविश्वास आम्ही ढळू देत नसू. दहावीची दहशतच अशी भयंकर होती.

आजही परिस्थिती काही (फारशी) जास्त बदललेली नाहीये. त्याकाळी निदान आई-वडील फटाफटा बोलून, प्रसंगी चार दोन लगावून विषय संपवून टाकत. हल्लीचे parents मात्र २४x७ मुलांच्या मागे असतात. कुठे  होतास,काय खाल्लस, कोणाबरोबर होतास, घरी कधी येणार, एव्हढा उशीर का ? अरे, मुलांना काही space देणार की नाही ?

बरे दहावीचे महत्व आता तेव्हढे उरलेले आहे का ? खरे म्हणजे सायन्स, कॉमर्स की आर्टस् हे ठरवून आपल्या घराजवळच्या चांगल्या कॉलेजात ऍडमिशन मिळाली की झाले, नाही का ? पण जर प्रत्येकाला आपला बाळ्या बोर्डातच यायला पाहिजे असेल तर मात्र कठीण आहे. मार्कांच्या शर्यतीत जीव तोडून धावण्यापेक्षा आपल्या पाल्याची खरी आवड ओळखणे व तिच्याशी मिळते जुळते करिअर निवडायला त्याला मदत करणे हे शाळा समाप्तीच्या वर्षाचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे.

हल्लीचे parents मात्र त्याचे दहावीचेच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचे timetable ठरवून त्याला फरफटत नेतात. हे सुद्धा विसरतात कि आपण मुलाचे ‘पालक’ आहोत, ‘मालक’ नव्हे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s