संपादकीय ऑगस्ट २०१९

_mg_0080लहानपणी आम्हाला क्रिकेटचे वेड होते. शाळेतल्या मधल्या सुट्टीत क्रिकेट, वर्गात बाकावरचे क्रिकेट, घरी आल्यावर क्रिकेट, घरातल्या भिंतींवर गावस्कर, रिचर्ड्सचे फोटो, पुढे थोडे मोठे झाल्यावर प्लेग्राऊंडवर मॅचेस, त्यामधली भांडणे, गावस्कर-विश्वनाथ, बेदी-चंद्रा ह्यामध्ये चांगले कोण ह्यावरून होणारे वाद. कॉलेज बुडवून वानखेडेवर बघितलेल्या मॅचेस, घरी खाल्लेला ओरडा, मागे पडलेला अभ्यास, ह्या सर्वांमुळे ते दिवस क्रिकेटनेच मंतरलेले होते. आमची पूर्ण पिढी क्रिकेटमध्येच न्हाऊन निघाली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आजही मला असेच वाटते की भले त्यामुळे इतर खूप नुकसान झालेले असू दे पण क्रिकेटने आम्हाला जो आनंद दिला आहे त्याला तोड नाही. No regrets at all!

हे फक्त क्रिकेट पुरतेच मर्यादित नाहीये. ‘खेळ’ ही गोष्टच अशी आहे. अभ्यास महत्वाचा असतो, पुढे त्याचाच फायदा होतो, हे सर्व जरी खरे असले तरी खेळाचे आपल्या आयुष्यात अनंन्यसाधारण स्थान असते. खेळ हा शरीराबरोबरच आपले मनही सुधृद बनवतो. हरल्यावर खचून न जाता परत त्याच उत्साहाने मैदानात उतरायला शिकवतो. प्रतिस्पर्धी पुढली चाल काय करेल ह्याचा विचार करायला शिकवतो. सर्वात महत्वाचे म्हणजे खेळ आपल्याला सभ्यता, माणुसकी शिकवतो, माणसात राहायला शिकवतो. हरलेल्याला सुद्धा सन्मान द्यायला शिकवतो आणि जीवनात यशस्वी व्ह्यायचे असेल तर काही नियम पाळावेच लागतात हे ही शिकवतो. मला सांगा हे विषय कुठल्या शाळेत शिकवतात ?

आजची तरुण मंडळी कॉम्प्युटरच्या, मोबाईलच्या आहारी गेली आहेत अशी ओरड सर्वत्र ऐकू येते. माझा त्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये. आजच्या युगाचा तो मंत्रच आहे. पण त्याच बरोबर थोडे मैदानी खेळ सुध्हा खेळा. कपड्यांना, अंगाला थोडी माती लागूदे, घामानी शरीर ओलेचिंब होउदे. ह्यातूनच कदाचित कधीतरी जीवनाला स्पर्श केल्याचे समाधान मिळेल !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s