संपादकीय जून २०१९

_mg_0080जसे मुंबईच्या काही भागात कामगार संघटनांचे जाळे आहे त्याच प्रमाणे पार्ल्यात सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचा प्रभाव आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. घरटी एक तर माणूस कुठल्याना कुठल्या संस्थेशी निगडित असतोच असतो. ह्या संथांचे विविध उपक्रम व कार्यक्रमच पार्ल्याला श्रीमंती आणतात हेही तेव्हढेच खरे आहे.

पार्ल्यातील बहुतांश संस्था ह्या ‘Charitable Trust’ म्हणून नोंदणीकृत आहेत व त्यानुसारच त्यांनी कारभार हाकावा अशी अपेक्षा आहे. कुठल्याही एका व्यक्तीचे वा गटाचे प्राबल्य संस्थेत होऊ नये, निर्णयप्रक्रिया लोकशाही पद्धतीची व पारदर्शी असावी अशी नागरिकांची अपेक्षा असते. संस्थेचे उपक्रमसुद्धा समाजातील सर्व स्तरांच्या सांस्कृतिक व व्यावसायिक गरजा ओळखून आखले पाहिजेत अन्यथा अनेक सामाजिक गट संस्थेपासून दुरावतात, आपली वेगळी चूल मांडतात. अर्थात लोकाभिमुकता जपण्यासाठी अश्या प्रकारचे अभिसरण वेळोवेळी होणे गरजेचे आहे.

आम्ही प्रसारमाध्यमे संस्थांचे उपक्रम, कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवतो, त्यांना प्रसिद्धी देतो, कधी कधी त्यांवर किंवा प्रसंगी संस्थेवरसुद्धा टीकाटिपण्णी करतो. सामाजिक काम म्हणजे मतमतांतरे होणारच, काही आपल्या बाजूने तर काही विरुद्ध. ह्या सर्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. जर सर्वांकडून टीका होत असेल तर आपल्यालाच आत्मपरीक्षणाची गरज आहे हे पटले पाहिजे. ‘हा आमच्या संस्थेचा अंतर्गत मामला आहे. इतरांनी ढवळाढवळ करू नये’ असे काही ‘संस्थानिक’ म्हणतात. सामाजिक, सांस्कृतिक संस्थेचा कुठलाही मामला ‘अंतर्गत’ राहात नाही. त्यावर टीकाटिपण्णी होणारच. ज्याला ती पचवता येत नाही त्याने असल्या कामातून रजा घ्यावी हे उत्तम !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s