संपादकीय मे २०१९

_mg_0080वार्षिक परीक्षेनंतर येणारी दोन महिन्याची उन्हाळी सुट्टी ही म्हणजे आम्हा मुलांसाठी पर्वणीच असायची. मुक्तपणे, स्वच्छंदपणे हुंदडायचे. खाण्याची, दमण्याची, झोपण्याची, कश्याची म्हणून फिकीर नसायची. वेगवेगळे खेळ खेळायचे, झाडावर चढून आवळे, कैऱ्या शर्टाला पुसून खायच्या, वाऱ्यासारखे भिरभिरायचे आणि संध्याकाळी भुतासारख्या अवतारात घरी यायचे. ह्या सर्वात एक वेगळीच मजा होती. आत्ताच्या भाषेत सांगायचे तर ‘ perfect stress relieving and unwinding’.

गेल्या काही वर्षात मात्र हे चित्र पालटले. मुलांचा ‘सर्वांगीण विकास’ व्हावा ह्या अट्टाहासापायी मुलांना सुट्टीत एक नव्हे तर अनेक शिबिरात घालण्याची फॅशन आली. एकदा का मुलांना शिबिरात अडकवले की आपली जबाबदारी संपली असा ‘professional’ विचार करणारे पालक ही होतेच. सकाळी योग शिबीर, दुपारी हस्तव्यवसाय तर संध्याकाळी जिम्नॅस्टिकस. दिवस संपला तरी शिबिरे संपायची नाहीत.  मुले कंटाळून जायची. ह्यापेक्षा शाळाच बरी होती असे वाटायला लागायचे.

काळाचे चक्र फिरतच असते. जगण्याचे आयाम बदलत असतात. गेल्या १/२ वर्षात शिबिरांचे स्तोम थोडे कमी झाल्यासारखे वाटतेय. ‘सुट्टीत मुलांना मोकळेपणे
बागडू द्या’ हा विचार पुढे येतो आहे. मुले सुद्धा शिबिरांपेक्षा सहली, ट्रेक्स, साहसी पर्यटन, अश्या विषयांना प्राधान्य देतायत. ४०-५० वर्षांपूर्वीचे जग आणि आत्ताचे जग ह्यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. आत्ताची मुले ज्या जगात भविष्यात पाऊल ठेवणार आहेत त्याची आव्हाने व गरजा पूर्णपणे वेगळ्या आहेत. Internet, Computer, Wifi ने निर्माण केलेले Virtual जग झपाट्याने विस्तारत आहे. मुलांच्या सृजनशीलतेला खुणावत आहे. Ted talk, Web Series सारख्या नवनवीन कल्पनांवर आजची मुले काम करत आहेत. मुलांनी मोठेपणी कोण व्हायचे हे आपण पालकच ठरवून मोकळे होतो, निदान सुट्टीत काय करावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तरी आपण त्याला / तिला देणार आहोत की नाही ?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s