संपादकीय – जानेवारी २०१८

_mg_0080विलेपार्ल्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक घडामोडींशी निगडित असणाऱ्या ‘आम्ही पार्लेकर’ या वृत्तपत्राचे हे 27 वे वर्ष! ‘बदलत्या पार्ल्याचे प्रतिबिंब’ या ब्रीदवाक्याला अनुसरून याचे बाह्यस्वरुप तसेच अंतरंग यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

पार्ल्यात सामाजिक तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. साहजिकच पार्ले हे मुंबईतील एक महत्त्वाचे सांस्कृतिक-शैक्षणिक केंद्र म्हणून नावारुपास आले. येथे पूर्वीपासून असलेल्या मध्यमवर्गाची पुढील पिढी उच्चशिक्षित झाली व त्यांना नोकरीप्रमाणेच व्यवसायाची स्वप्नेसुद्धा पडू लागली. गेल्या काही वर्षांत अनेक तरुणांनी नोकरीकडे पाठ फिरवून व्यवसायाची निवड केली.

ह्या उद्योजकतेला आकार देण्यासाठी Saturday Club, BBNG ह्या सारख्या संस्थांनी पुढाकार घेतला. दुकाने, eating joints ह्याचप्रमाणे कल्पनेवर किंवा नवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक व्यवसाय पार्लेकर तरुणांना खुणावत आहेत. गेल्या काही वर्षात नोकरी व्यवसाय हा आपल्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे हे सत्य आहे.

ह्याच व्यवसायाभिमुखतेला व्यक्त होण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ मिळावे या विचाराने ह्या महिन्यापासून ‘आम्ही पार्लेकर’मध्ये ‘उद्योगमंच’ हा नवीन विभाग सुरू करत आहोत. यात विलेपार्ले परिसरातील उद्योगविश्वाशी संबंधित बातम्या, नवीन उत्पादनांची माहिती, यशोगाथा, तज्ज्ञांचे लेख यांचा समावेश करण्यात येईल.

मला विश्वास आहे की, विलेपार्ल्यातील उद्योग जगताला “उद्योगमंचा’चा फायदा होईल आणि सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्राबरोबरच पार्ले ही “उद्योग नगरी’ म्हणूनसुद्धा नावारुपाला येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s