संपादकीय – नोव्हेंबर २०१७

_mg_0080

साधारण गणपती पासून सणासुदीला सुरुवात होते असं म्हणतात. गणपती पार पडले, टिळक मंदिराची ग्राहक पेठ संपली, दिवाळीही झाली. सर्व काही व्यवस्थित झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी एकूणच आवाजाचा आणि फटाक्याचा त्रास कमी झाला. दरवर्षी गणपतीचा आदला दिवस आणि विसर्जनाचा दिवस म्हणजे सामान्य लोकांची परीक्षाच असते. अनेक घरी ह्या दोन्ही दिवशी सर्व दारं खिडक्या बंद करून कानात कापसाचे बोळे कोंबून लोक सर्वात आतल्या खोलीत बसतात. जेष्ठ नागरिकांचे तर अजूनच हाल होतात. वयानुसार नाजूक झालेली श्रवणशक्ती आणि हृदय ह्या दोन्हीवर खूप ताण पडतो. दिवाळीच्या दिवसात तर अनेक कुटुंबं बाहेर गावीच जाणं पसंत करतात.

हे आवर्जून नमूद केले पाहिजे की ह्या वर्षी गणपती, दिवाळी ह्या दोन्ही सणांच्या वेळी आवाजाचं आणि हवेतील प्रदूषण ह्या दोन्ही गोष्टींची पातळी खूपच कमी होती. खरं म्हणजे मला स्वतःला फटाके उडवायला आवडतात, वाजत गाजत जाणाऱ्या मिरवणुका सुद्धा आवडतात, पण ह्यामुळे कुणाला त्रास झालेला आवडत नाही. त्यामुळे मिरवणूकवाल्यांनी आणि फटाके उडवणाऱ्यांनी इतरांची थोडी काळजी करावी तसंच लोकांनीही ह्या मंडळींच्या उत्साहाला समजून घ्यावं अशा मताचा मी आहे. मला माहीत आहे कि ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणं खूप कठीण आहे पण ह्यावर्षी मात्र असंच वातावरण होतं. लहान मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये झालेली ध्वनी व हवेतील प्रदूषणाविषयीची जागृती हे ह्याचं महत्वाचं कारण मानलं जाऊ शकतं.

दिल्लीमध्ये फटाके विकण्यावर न्यायालयाने बंदी घातली होती. आपल्या इथं तशी बंदी नसताना लोकांनी स्वतःहुन मनाला घातलेला आवर नक्कीच कौतुकास्पद आहे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s