संपादकीय – ऑगस्ट २०१७


_mg_0080नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या केंद्रीय अर्थविषयक अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. कसे चित्र आहे हे ? काय वाढून ठेवले आहे भविष्यात ?

आपला राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर ५.३ % एवढा खाली घसरला आहे. गेल्या तीन वर्षातील उत्पन्न वाढीच्या दराचा हा निचांक आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी हाच दर ७ % च्या आजूबाजूला राहील असे सांगितले होते. इथे हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की सध्या सांगितल्या जाणाऱ्या दराचे ‘Base Year’ काही वर्षांपूर्वी बदललेले आहे. ह्या सर्वामुळे हा दर फारच अनाकर्षक वाटू लागतो !

अहवालात स्पष्ट झालेली दुसरी गोष्ट म्हणजे रोजगार निर्माण करण्यात सरकारला आलेले अपयश. वर्षाकाठी सुमारे एक करोड नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन देणाऱ्या नव्या सरकारने ह्याच्या एक दशांशसुद्धा नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत. जगातील सर्वात जास्त तरुण उद्या आपल्या देशात असणार आहेत. जर त्यांच्या हातात रोजगार नसेल, तर ह्याच हातात दगड यायला वेळ लागणार नाही हे आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे.

नाही, सरकारने जनतेला फसवले असे सरसकट विधान मी करणार नाही. भारतासारख्या महाकाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा हाकायचा ही काही सोपी गोष्ट नाही. त्यात नोटबंदी व GST सारख्या निर्णयांमुळे आज तरी अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे हे निश्चित. मोठ्या उद्योगात नोकरी कपात होत आहे. छोट्या व लघु उद्योगांची परिस्थिती ‘आज मरतो की उद्या’ अशी आहे. ‘Make In India’, ‘Start Up India’ अशा घोषणांना अजूनही मूर्त स्वरूप यायचे आहे.

भारतीय जनता ही ‘निर्ढावलेली’ आशावादी आहे. ह्या वर्षी पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे येणारे दिवस सुगीचे ठरोत असा (भाबडा) आशावाद अजूनही सुटत नाही !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s