संपादकीय – फेब्रुवारी २०१७

_MG_0080.JPGमुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, पण अजूनही वातावरण शांतच आहे. शिवसेना-भाजपमधे युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी ह्यांच्यात आघाडी होणार का, हा सध्या सर्वात कळीचा मुद्दा आहे. आपण स्वतंत्रच लढू असे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार म्हणत आहेत. मात्र अजून (दि. 25 जानेवारी पर्यंत) असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सर्व पक्षांकडून सांगण्यात येत आहे. अजून उमेदवारीचीच खात्री नसल्याने प्रचाराची रणधुमाळी सुरू व्हायला थोडा अवकाश आहे.

प्रचार चालू झाला नसला तरी निवडणूकीपूर्वीची बेरीज वजाबाकी सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते व माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे मागील मनपा निवडणुकीत मनसेतर्फे लढून थोड्या फरकाने पराभूत झालेल्या वीणा भागवत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात जरी भाजपचे ऍड.पराग अळवणी आमदार असले तरी ह्यातील सात प्रभागांमध्ये इतरही पक्षांचे नगरसेवक आहेत. ह्या अर्थाने विलेपार्ले हे कुठल्याही एका पक्षाची मक्तेदारी नसून सर्वच पक्षांना ह्या निवडणूकीत संधी आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

पार्ल्याचा बराचसा भाग हा सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी व्यापलेला असल्याने येथे गुंडगिरी, कचऱ्याचे ढीग असे प्रश्न तुलनेने कमी आहेत पण वाहतूक व्यवस्थापन, अनधिकृत फेरीवाले, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेदरकारपणे केलेले पार्किंग ह्या समस्या पार्लेकरांना नक्कीच भेडसावत आहेत. ह्याशिवाय त्या त्या परिसराचे काही स्थानिक प्रश्न असतील ते वेगळेच !

गेल्या 2/3 वर्षात पार्ल्यातील अनेक रस्त्यांची डागडुजी पूर्ण झाली आहे पण पार्लेश्चर मंदिर चौक, संत जनाबाई मार्ग, इंदुलकर मार्ग व इतर काही भागात अजूनही काम चालू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. वाहतूकीच्या समस्येकडेसुद्धा गांभिर्याने बघायला पाहिजे.

पार्ल्याचा नगरसेवक (किंवा नगरसेविका) हा सुशिक्षित, सुसंस्कृत तर असावाच पण नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी धडपडणारासुद्धा असावा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s