संपादकीय – जानेवारी २०१७

dacहा लेख तुम्ही वाचाल तेव्हा 2016 साल संपून 2017 सुरू झाले असेल, नव वर्षांचा जल्लोष संपून आपले सर्वांचे चाकोरीबद्ध आयुष्यही सुरू झाले असेल. सरकारने दिलेल्या नोटबंदीच्या धक्क्यातून सुद्धा तोवर आपण बरेचसे सावरले असू.

कसे होते 2016 साल? महाराष्ट्राच्या दृष्टीने बघितले तर यंदा पाऊस व्यवस्थित पडला त्यामुळे गेले 2 ते 3 वर्षे हवालदिल असलेला बळीराजा काहीसा सुखावला. उद्योगक्षेत्रसुद्धा हळू हळू का होईना, पण प्रगती करत आहे असेच चित्र 2016 साली दिसले. हे सर्व बघता गेले वर्ष महाराष्ट्रासाठी चांगले गेले असे म्हणावयास काही हरकत नाही.

मुंबईपुरते बोलायचे झाले तर गेल्या वर्षी कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न बराच चर्चेत होता. महानगर पालिकेने प्रथम जाहीर केलेल्या आणि त्यानंतर परत मागे घेतलेल्या शहर विकास आराखड्यावरूनसुद्धा बरेच राजकारण झाले. त्यानंतर झालेल्या मेट्रो 2 व कोस्टल रोडच्या घोषणेने जनतेच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. वर्षाचा शेवट पंतप्रधान मोदींनी सागरस्थित शिवस्मारकाच्या भूमिपूजनाने केला. ह्या विषयी ‘स्मारक बांधण्यापेक्षा महाराजांचे गड किल्ले व्यवस्थित राखणे महत्त्वाचे आहे’ असाही सूर काही जणांनी काढला.

ह्या वर्षी पुढील महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका येत आहेत. मुंबईच्या जनतेला पालिकेचा कारभार कसा वाटतो?, पालिकेने जाहीर केलेल्या प्रकल्पांबद्दल त्यांचे काय मत आहे?, मुंबईच्या विकासाबद्दल त्यांची काय स्वप्ने आहेत? ह्या सर्व आशा आकांक्षांचे प्रतिबिंब निवडणुकीत पडावे अशी अपेक्षा आहे.

आपलं पार्लं हे मुंबईचाच एक भाग असल्याने त्याबद्दल वेगळे काय लिहिणार? स्वतःचा एक सुसंस्कृत चेहेरा व व्यक्तिमत्व असणाऱ्या ह्या उपनगराची व आपणा सर्वांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच नव वर्षानिमित्त सदिच्छा !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s