संपादकीय – डिसेंबर २०१६

dac

काही वर्षांपूर्वी पु ल देशपांडे ह्यांच्या साहित्याच्या स्वामित्वाचा वाद संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता. लोकमान्य सेवा संघाने हे हक्क आपल्याकडे आहेत असे सांगत भाईंच्या साहित्यावर चित्रपट काढू इच्छिणाऱ्या निर्मात्यांकडून काही रक्कम घेतली होती. ह्यावर पार्ल्यात चर्चा, वाद झडले व अंतिमतः त्या वेळच्या कार्यकारिणीला पायउतार व्हावे लागले. ‘ह्या विषयाची तड लवकरच लावू’ अशी ग्वाही नवीन कार्यकारिणीने दिली होती पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. आज ह्या गोष्टीला ४ / ५ वर्षे उलटून गेली आहेत, ग्वाही देणाऱ्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपून त्या पुढील कार्यकारिणी आली पण परिस्थिती मात्र ‘जैसे थे’ अशीच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून परत ह्या वादाला तोंड फुटले आहे व काही मराठी वृत्तपत्रात ह्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

पार्लेकरांचा टिळक मंदिर व त्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे. ते जर म्हणत असतील की त्यांच्याकडे भाईंच्या साहित्याचे स्वामित्व हक्क आहेत तर ते नक्कीच असतील. पार्लेकरांची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या संबंधीची कागदपत्रे लोकांसमोर आणावीत, कोर्टात सादर करावीत, ज्यायोगे ह्या वादावर कायमचा पडदा पडेल. त्यावेळच्या कार्यकारिणीकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासुद्धा मोकळेपणाने मान्य करायला काही हरकत नाही. लोकमान्य सेवा संघ ही पार्ल्यातील मध्यवर्ती सामाजिक संस्था आहे. पार्ल्याच्या जडणघडणीत टिळक मंदिराचा मोठा वाटा आहे. भाई तर पार्ल्याचे दैवतच! त्याचमुळे आज पार्लेकर व्यथित झाले आहेत. टिळक मंदिराचे व भाईंचे नाव ह्या कारणासाठी वृत्तपत्रात वारंवार ‘झळकणे’ पार्ल्याला शोभा देणारे खचितच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s