संपादकीय – ऑक्टोबर २०१६

dacऑक्टोबर 1991 मध्ये ‘आम्ही पार्लेकर’ चा पहिला अंक प्रकाशित झाला तेव्हा लोकांनी ह्या नाविन्यपूर्ण कल्पनेचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. त्यावेळी जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. एखाद्या उपनगराचे स्वतःचे असे वार्तापत्र किंवा मुखपत्र असू शकते ही कल्पनाच मुळी त्याकाळी नवीन होती. नंतरच्या काही वर्षात मुंबईच्या इतरही उपनगरात काही वार्तापत्रे सुरू झाली पण त्यातील बरीचशी बंदही झाली.

‘आम्ही पार्लेकर’चे त्यावेळचे स्वरूप बघता त्यात पूर्ण साहित्यमूल्य असलेले लेख जागेअभावी छापता येत नसत. त्यातूनच वर्षातून एखादा मोठा अंक काढावा, ज्यात उत्तमोत्तम साहित्याचा समावेश होऊ शकेल अशी कल्पना पुढे आली. दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत आपला अंक हरवून जाईल, त्यापेक्षा आपण डिसेंबरमध्ये वार्षिक अंक काढून आपले वेगळे अस्तित्व राखावे असे वाटून 1996 पासून आपण वार्षिक अंक प्रकाशित करत आहोत.

गेल्या 25 वर्षात काळ खूप बदलला आहे, तसेच मराठी साहित्य विश्वसुद्धा बदलले आहे. आज दिवाळी अंक हे मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रमुख माध्यम बनले आहे. ह्या काळात ‘आम्ही पार्लेकर’ चा वार्षिक अंकसुद्धा अनेक अर्थांनी समृद्ध बनला आहे. नामवंतांच्या मुलाखती, दर्जेदार साहित्य, उत्तम मांडणी, देखणी सजावट ह्यामुळे आपला वार्षिक अंक कुठल्याही दिवाळी अंकाची बरोबरी करू शकेल असा विश्वास आम्हाला, आमच्या लेखकांना व त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आमच्या वाचकांना वाटत आहे.

हा सर्व विचार करून व ‘आम्ही पार्लेकर’ च्या रौप्य महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून ह्या वर्षी वार्षिक अंकाऐवजी दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे योजले आहे. या निमित्ताने पार्ले व मुंबईच्या परिघातून बाहेर पडावे व दिवाळी अंकासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वाचक वर्ग मिळवावा असा मानस आहे.

पार्लेकरांच्या शुभेच्छा नेहमीच आमच्या पाठीशी असतात, ह्याही वेळी त्यांची गरज आहे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s