संपादकीय – ऑगस्ट २०१६

DAC“सध्या पार्ल्यातील तरुणांची संख्या वाढलीये की काय ? एवढी मुले रस्त्यावर कशी दिसतात ?” मी न राहवून चिंटूला विचारले.

“अरे बाबा, आम्ही सगळे सध्या “पोकेमॉन गो’ खेळतोय ना, म्हणून ते पोकेमॉन पकडायला रस्त्यावर जावेच लागते. खूप चालावे लागते. काल तर मी 8 किलोमीटर चाललो माहीतेय !”

तरीच ! एवढे दिवस घरी कॉम्प्युटरसमोर बसणारी किंवा मोबाईलमध्ये तासनतास रमणारी ही मुले अचानक रस्त्यावर दिसल्यामुळे मला आश्चर्याचा (सुखद) धक्का बसला होता, त्याचे कारण कळले !

गेल्या दशकात जग खूप बदलले आहे असे म्हणतात पण मला तर वाटते की गेल्या 2/3 वर्षात ज्या वेगाने बदल घडत आहेत त्याला तोड नाही. सोशल मेडिया, वेगवेगळे apps, virtual reality, सर्वच झपाट्याने बदलत आहे. पूर्वीचे नाते संबंध हळूहळू ढासळत आहेत. ह्या सर्व स्थित्यंतरातून ही तरुण पिढी जात आहे, जाणार आहे. मग कशी होईल त्यांची मानसिकता? चिंटूला एवढे दिवस ‘संध्याकाळी घराबाहेर खेळा’ म्हणून ओरडत होतो पण पठ्या बधला नाही. आता मात्र पोकेमॉन पकडायला दिवसभर बाहेर !

एक मात्र चांगले झाले आहे. ह्या पोकेमॉनच्या निमित्ताने पोरांचा व्यायाम भरपूर होत आहे. अजून एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे आपले व ह्या पिढीचे काही म्हणजे काहीच जुळत नाही. सिनेमा, गाणी, वाचन, खाण्याचे पदार्थ, सर्व बाबतीत पूर्णपणे भिन्न पसंती ! अर्थात हेही तेवढेच खरे आहे की त्यांच्यासमोरील जगसुद्धा आपल्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. मग त्यांना ओढून ताणून आपल्या जगात आणायचा प्रयत्न का करायचा ? तरी पार्ल्यात अनेक मैदाने आहेत व आनंदाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी ती तरुणाईने ओसंडून वाहात असतात.

“बाबा, अरे आम्ही ग्राऊंडवरसुद्धा खेळतो आणि मोबाईलवरसुद्धा खेळतो. काय चूक आहे ह्यात ?” ह्यावर माझ्याकडे उत्तर नव्हते, मात्र नकळत चिंटू विषयीची काळजी कमी झाल्याचे जाणवले हे नक्की !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s