संपादकीय – जुलै २०१६

DACशाळा कॉलेज सुटून इतकी वर्षे झाली पण १०वी, १२वी चा निकाल जवळ आलाय म्हटल्यावर अजूनही टेन्शन येते. याचे खरे कारण म्हणजे आई- वडिलांची भीती हे नसून आम्ही वर्षभर (न) केलेला अभ्यास, हे आता कबूल करायला हरकत नाही !

आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. गेल्या काही वर्षात आई-वडील व त्यांची दोन मुले अश्या चौकोनी कुटुंब पद्धतीचा उदय झाला आहे. त्यामुळे पालकांच्या सर्व आशा, आकांक्षा, स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्ने ह्यांचा भडिमार बिचाऱ्या मुलांवर होतो. जागतिक स्तरावरील मंदी व अस्थिरता, कंपनीचे खालावलेले प्रगती पुस्तक, ऑफिसमधील ताणतणाव ह्या सगळ्यांचे पडसाद आपल्या कौटुंबिक वातावरणावर पडू लागले आहेत. त्यामुळेच आज अनेक विद्यार्थी हा ताण पेलू शकत नाहीयेत. काहींना तर मानसिक आजारांनासुद्धा सामोरे जावे लागत आहे.

पण खरे सांगू का, एवढे टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाहीये. पूर्वीच्या काळी नसणारी कित्येक नवी क्षेत्रे आज विकसित झाली आहेत. इंजिनियरिंग, वैद्यकीय व्यतिरिक्त आज अनेक क्षेत्रात जागतिक पातळीवर संधी निर्माण होत आहेत. शाळा कॉलेजमध्ये मिळवलेले मार्क म्हणजे सर्व काही असे समजण्याचे दिवस कधीच मागे पडले आहेत. पण अनेक पालक त्यांच्या जुन्या मतांमध्ये, दृष्टीकोनामध्ये बदल करायला तयार नाहीयेत आणि ह्यामध्ये बळी जातोय तो विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचा, त्याच्यातील सुप्त कलागुणांचा !

ह्यात थोडी जबाबदारी विद्यार्थ्यांवरसुद्धा आहे. आपल्याला कशात गती आहे, कोणते क्षेत्र आपल्याला आवडते हे जर त्यांनी (पालकांच्या मदतीने) लवकर ओळखले तर पालकांचा ताण तर दूर होईलच पण निर्णय प्रक्रियासुद्धा सोपी होईल. आणि हो, आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपली कामगिरी चमकदार होईलच व खऱ्या अर्थाने जीवन आनंदी होईल, हे वेगळे सांगायची गरज आहे का ?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s