संपादकीय – जून २०१६

DACकशाने तरी झपाटणे हे तरुणाईचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल. एके काळी क्रिकेट व हिंदी सिनेमाने तरुण भारावून जायचे. सुनील गावस्कर व अमिताभ बच्चन हे तरुणांना घरच्यांपेक्षा जवळचे वाटत. त्याकाळी टेस्ट मॅचेस कमी होत पण क्रिकेटवेडे तरुण रणजी व कांगा मॅचेससुद्धा सोडायचे नाहीत. अमिताभचा नवा सिनेमा येत असेल तर फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटे मिळवायला रात्रभर लायनीत उभे राहायला काहीच वाटायचे नाही. काळ जसा पुढे सरकत गेला तशी गावस्करची जागा तेंडूलकरने घेतली. अमिताभचा दबदबा थोडा कमी झाला. तरुणांनीसुद्धा मग दुसरे पर्याय शोधले.

आजचा तरुण हा क्रिकेट पेक्षा फुटबॉलवेडा आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. एके काळी ऑस्ट्रेलिया श्रेष्ठ की वेस्ट इंडिज हे वाद तरुणात रंगायचे. त्याची जागा आता चेल्सी श्रेष्ठ की मॅनयु ह्या वादाने घेतली आहे. कित्येक तरुण जगाच्या पाठीवर होणारी प्रत्येक फुटबॉल लीग फॉलो करतात. तरुणांच्या टी शर्ट वरील लोगो आणि फोटो बघितले तरी ही बाब सहजपणे लक्षात येऊ शकते. मग आपला पार्लेकर तरुण ह्यामध्ये मागे कसा राहील ? गेल्या काही वर्षात पार्ल्यातील मैदाने क्रिकेटने नव्हे तर फुटबॉलने फुलत आहेत हे आपल्या लक्षात आले आहे का ? सुरवातीला क्रिकेटच्या कट्टर रसिकांना टी-ट्वेंटी हा खेळाचा format आवडत नसे पण आज तो सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. फुटबॉलमध्ये असे formats पूर्वीपासून अमलात आणले जात आहेत. ‘आम्ही पार्लेकर’ च्या पुढाकाराने 20 वर्षांपूर्वी पार्ल्यात डहाणूकर कॉलेजजवळील मैदानात क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. आजच्या फुटबॉल वेड्या युवकांनी पार्ल्यात ‘पार्ले प्रिमियर लीग’ सुरू केली आणि तरुणांच्या फुटबॉल प्रेमाला व्यक्त होण्याची अफलातून संधी दिली ! Three Cheers to PPL !!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s