नगरसेविकांची ग्वाही, पावसाआधी रस्तेदुरुस्तीची कामे पूर्ण होणार!

 

road rollar_1आपल्या परिसरातील रस्त्यांच्या संदर्भात काही समस्या असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन नगरसेविकांतर्फे करण्यात आले आहे.

पहिल्याच पावसानंतर रस्त्यांत खड्डे पडणे, पाणी साचणे, पर्जन्य जलवाहिन्या तुंबणे असे प्रकार अनेकदा होतात आणि मग रस्ता दुरुस्तीच्या कामांची आठवण होते. खरे तर ही कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण व्हायला हवीत.

याबाबतीत विलेपार्ले परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून कुठली कामे करून घेतली जात आहेत हे जाणून घेण्यासाठी “आम्ही पार्लेकर’ने पार्ल्याच्या नगरसेविकांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेवरून असे दिसते की येत्या पावसाळ्यात नागरिकांना फारशा गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही.

वॉर्ड क्र. 80 च्या नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या विभागात श्रद्धानंद मार्ग, एन.पी.ठक्कर मार्ग, नंदा पातकर मार्ग, संत जनाबाई मार्ग व उत्कर्ष मंडळ ते संत जनाबाई मार्ग ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल.

वॉर्ड क्र. 79 च्या नगरसेविका शुभदा पाटकर यांच्या विभागात इंदुलकर मार्ग, कॅ. विनायक गोरे मार्ग, श्री स्वामी समर्थ मार्ग, टिळक विद्यालय मार्ग आदी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पोद्दारवाडीतील रहिवाश्यांची पाण्याची गैरसोय लक्षात घेऊन त्याठिकाणी दोन इंचाची पाण्याची लाईन टाकण्यात येत आहे.

वॉर्ड क्र. 77 च्या  नगरसेविका विनी डिसुझा यांच्या विभागातील न्यायमूर्ती छगला मार्गाच्या दुरुस्तीचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. महानगर पालिका आणि विमानतळाच्या परिसराच्या नूतनीकरणाचे कंत्राट घेतलेली जीव्हीके ही कंपनी या दोघांपैकी कोणी या कामाची जबाबदारी घ्यायची या वादामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे मात्र या कामासंबंधी पाठपुरावा चालू आहे असे सांगण्यात आले.

 रस्ते दुरुस्तीबरोबरच ठिकठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या साफ करण्याचे काम, मलनि:सारण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे सध्या चालू असलेल्या 20 % पाणीकपातीला पावसाळ्यापर्यंत तरी पर्याय नाही. त्यादृष्टीने पार्ल्यातील काही ठिकाणच्या विहिरी साफ करून त्या पुनरुज्जिवित करण्यात आल्या आहेत. सध्या अनेक ठिकाणी टेलिफोनच्या केबल्स टाकण्याचे काम चालू असल्याने रस्ते उखडलेले दिसत आहेत. पुढील पंधरवड्यात हे काम पूर्ण होऊन रस्ते पूर्ववत होतील अशी अपेक्षा आहे.

गेली दोन वर्षे वरुणराजाने हुलकावणी दिली असली तरी यंदा मात्र पाऊस चांगला व वेळेत पडेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नगरसेविकांनी दिलेल्या ग्वाहीनुसार उपरोक्त कामे नियोजित वेळेत पार पडली तर पार्लेकरांसाठी हा पावसाळा खऱ्या अर्थाने सुखावह होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s