संपादकीय – फेब्रुवारी २०१६

DACवर्षभर उकाड्याने हैराण होणाऱ्या मुंबईकरांना सध्या सुखद गारवा जाणवत आहे. ह्याच सुमारास पार्ल्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने पार्लेकर गुलाबी थंडीची मजा अधिकच अनुभवत आहेत. मॅजेस्टिक गप्पा, जाणता राजा ह्यासारख्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. खरेच, पार्ल्याचा सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे ह्यात शंका नाही!

मात्र हे पार्ले म्हणजे संपूर्ण पार्ले नव्हे. ह्या पार्ले गावात एक दुसरे पार्लेसुद्धा वसते आहे, कनिष्ठ वर्गाचे! बाबांचा कामधंदा यथातथाच, आई घरकाम किंवा तसेच काहीतरी काम करणारी, मुले मराठी शाळेत, महिन्याचा खर्च भागवता भागवता मारामार, अनेक ठिकाणी उधारी! हे सुद्धा पार्लेकरच आहेत ना! ह्यातील अनेक लोक “फ्लॅटवाल्या’ पार्लेकरांसाठी अनेक वर्षं राबत आहेत. कोणी फुले विकते, कोणी केळी तर कोणी गरे. कोणी चपला-बुट दुरुस्त करतो तर कोणी इलेक्ट्रिशनचे काम करतो. पण ह्यांची दखलसुद्धा घेतली  जात नाही. सध्याच्या जल्लोषपूर्ण वातावरणात ह्या वर्गाची आठवण किती लोकांना होते? काय करतो आपण त्यांच्यासाठी?

पार्ल्याला शिक्षणाचे माहेर म्हणतात. पण पार्ले टिळक व महिला संघ सोडल्यास इतर मराठी शाळांची काय अवस्था आहे? ना पुरेसे आर्थिक पाठबळ, ना अनुभवी शिक्षकवर्ग, ना खेळायला मैदाने, ना आधुनिक सुखसोयी. वर्गातले विषयच अपुरे राहतात तर सहली आणि इतर शैक्षणिक उपक्रम कुठले होणार? कसे घडणार विद्यार्थी अशा शाळेत? कसा होणार त्यांचा सर्वांगीण विकास? मराठी शाळांना तर शेवटची घरघर लागली आहे.

पार्ल्यात उच्चभ्रू शाळांतून निवृत्त झालेले अनेक शिक्षक राहतात. तसेच विविध क्षेत्रातील अनुभवी मंडळीही राहतात. काय हरकत आहे त्यांनी आपला थोडा वेळ, थोडा अनुभव अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना द्यायला?

ह्या शाळांची, तेथील विद्यार्थ्यांची, त्यांच्या भविष्याची थोडी जबाबदारी प्रस्थापित शाळांनी व पार्लेकरांनी घेतली तर आपले पार्ले खऱ्या अर्थाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर ठरेल, होय ना!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s