संपादकीय – जानेवारी २०१६

DAC.jpgसर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या अंकापासून ‘आम्ही पार्लेकर’चे पंचविसावे वर्ष सुरु होत आहे. चार पानांच्या कृष्ण्धवल आवृत्तीपासून सुरू झालेल्या या मुखपत्राने 16 पानांच्या रंगीत आवृत्तीपर्यंत मजल मारली आहे. विषयातील वैविध्य राखण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तरीसुद्धा पंचविसाव्या वर्षाचे एक वेगळे महत्त्व असते. ‘बदलत्या पार्ल्याचे प्रतिबिंब’ म्हणवून घेणाऱ्या ‘पार्लेकर’चे स्वरूपही आता बदलले पाहिजे हा विचार गेल्या वर्षीच्या मध्यावरच सुरु झाला. अंकाची मांडणी, लेखांचे विषय, एवढेच काय तर अगदी लोगोसुद्धा बदलायचे असे ठरले. अनेकांशी चर्चा झाली, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले, आमची टीमसुद्धा कामाला लागली व ह्या सर्व प्रक्रियेचे फलित म्हणजे हा जानेवारी 2016 चा अंक. अनेक नवी सदरे, नवे विषय ह्या अंकात समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘जोडी तुझी माझी’, ‘बुकमार्क’, ‘आम्हीही पार्लेकर’, ‘पडद्याच्या पलीकडले’, ‘चाणक्यनीती’ ‘पार्ले ब्लॉग’, ‘चित्रजगत’ अशी अनेक नवी सदरे आपल्या पसंतीस उतरतील अशी अपेक्षा आहे. अंकाचे स्वरूप एकतर्फी न राहता संवादात्मक असावे ही भूमिका आम्ही स्वीकारली आहे. पार्ल्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात होणारे बदल, नवनवीन कल्पना, त्या त्या क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग अंकात करण्याचे योजले आहे.

अंकाच्या मांडणीवरसुद्धा बरेच काम करण्यात आले आहे. मुखपृष्ठ व इतरही पाने आकर्षक दिसावीत, वाचनाचा जास्तीत जास्त आनंद मिळावा ह्यासाठी विशिष्ट फॉंट व आकार ठरवण्यात आला आहे. सर्वात किचकट, नाजूक पण महत्त्वाचा विषय होता लोगो बदलण्य़ाचा. ‘लोगो बदलायची गरज आहे का ?’ इथपासून सुरवात करत ‘नवा लोगो कसा असावा ?’ ह्या मुक्कामापर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. नवा लोगो स्मार्ट असावा, आपली पार्ल्याशी असलेली बांधिलकी अधोरेखित करणारा असावा असे ठरले. त्यानुसार अनेक पर्यायांमधून ह्या अंकावरील लोगो निवडला आहे.

ह्या अंकातील लेख, मांडणी व लोगोविषयीचे आपले मत, आपल्या प्रतिक्रिया, सूचना ह्यांचे स्वागतच आहे. पुढील अंकात नक्कीच त्याचे प्रतिबिंब उमटेल !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s