सीकेपी बॅंकेवरील निर्बंध ठेवीदारांचे भवितव्य काय?

बॅंकिंग नियमन कायद्याच्या कलम 35 अ आणि उपकलम (1) अन्वये, शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या सीकेपी को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या काही विशिष्ट व्यवहारांवर र्निबंध लादून, रिझर्व्ह बॅंकेने नुकतीच सीकेपी बॅंकेवर सर्वसमावेशक बंधने घातली आहेत. सीकेपी बॅंकेचा बॅंकिंग परवाना रद्दबातल केल्याचा अर्थ याद्वारे काढला जाऊ नये, असेही रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. ह्या र्निबंधांनुसार बॅंकेच्या बचत खात्यात, चालू खात्यात अथवा अन्य ठेव खात्यात जमा शिलकीतून ठेवीदारांना एक हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्याचप्रमाणे बॅंकेला नवीन कर्ज वितरण आणि कर्जाचे नूतनीकरण, कोणताही गुंतवणुकीचा निर्णय अथवा ठेवी स्वीकारून दायित्वात भर घालता येणार नाही.
कायद्याच्या दृष्टीने सहकारी बॅंक म्हणजे बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत असलेली सहकारी संस्था. भारतीय घटनेनुसार कायदेशीर बाबींचा विचार केला तर असे दिसते की सहकारी संस्था हा राज्याच्या अखत्यारीतला विषय तर बॅंका हा केंद्र शासनाचा विषय. सीकेपी बॅंकेच्या समस्येवर उहापोह केला असताना असे आढळते की सुमारे दोन वर्षांपूर्वी सीकेपी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने प्रशासकाची नियुक्ती केली. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल सीकेपी बॅंकेला नोव्हेंबेर 2012 साली पाच लाख रुपये दंड आकारला होता. त्यातून बॅंकेने काहीच लक्षणीय सुधारणा न केल्याने ठेविदारांनी आपल्या ठेवी कमी केल्या. ह्या समस्येतून बॅंक पुर्वपदावर येऊ शकली नाही.
रिझर्व्ह बॅंकेला सहकारी बॅंकेवर केवळ एका वर्षासाठीच प्रशासक नेमता येतो. त्यानंतर सहकार खात्याच्या प्राधिकरणामार्फत बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. परंतु सहकार प्राधिकरण अद्याप स्थापन झालेले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सीकेपी बॅंकेवर नेमलेला प्रशासक अद्याप कायम आहे. सहकारी बॅंकांच्या ह्या समस्यांवर उपाय करताना रिझर्व्ह बॅंक कठोर निर्णय घेण्यापूर्वी व्यवस्थापनाला सुधारण्याची संधी देते. व्यावसायिक बॅंकांचा विचार करता,सहकारी बॅंका हाताळताना, मर्यादित अधिकार असल्याने परिणामतः अशा बॅंका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंक जरा संथपणे घेते .परंतु ह्याचा विपरीत परिणाम नाहक भोगावा लागतो तो बॅंकांच्या सामान्य ठेवीदारांना. ह्यात भर पडते ती विम्याचे पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई.
डिपॉझिट इन्श्युरन्स ऍण्ड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन ही रिझर्व्ह बॅंकेशी संलंगन संस्था अशा वारंवार बंद होणारया सहकारी बॅंका आणि फिक्स्ड डेपॉज़िटवर येणारे विम्याचे दावे हाताळते. ह्या बाबतीत होणारी दिरंगाई आणि संवेदनशून्यता ही ठेवीदारांच्या जीवाशी खेळ करते. ह्या निर्बंधामुळे निव्वळ व्याजावर घर चालविणारया मध्यमवर्गीय निवृत्तीधारक ठेवीदारांमध्ये घबराट निर्माण होते.
ह्या बाबतीत निवृत्त बॅंकर श्री प्रभाकर कुलकर्णी सांगतात अशा बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने प्रशासक नेमण्यापूर्वी आजारी बॅंकेच्या ठेवीदारांची व व्यवसायाशी निगडीत नाळ ओळखून बॅंकेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा लोकांचा बॅंकिंग प्रणालीवरचा विश्वास उडेल. तसेच ज्या ठेवीदारांच्या ठेवी 25 ते 50 लाखात असतील व जे निवृत्त पगारदार असतील त्यांना प्राधान्य देण्याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे असावीत .आपल्या नातेवाईकांची बॅंकेच्या महत्त्वाच्या ठिकाणी वर्णी लावणाऱ्या संचालकांवर अंकुश ठेवणे निकडीचे आहे.
ह्या सर्व प्रकरणात बॅंकेचे आणि पर्यायाने सुमारे पावणे सहा लाख ठेवीदारांचे भवितव्य सध्या तरी अधांतरी आहे. ह्यातून मार्ग म्हणजे एखाद्या भक्कम बॅंकेबरोबर विलिनिकरणाशिवाय सध्या तरी कोणताही पर्याय सध्या दिसत नाही. परिस्थितीचे निरपेक्ष आकलन करता ह्या प्रकरणी रिझर्व्ह बॅंकेला दोष देणे उचित होणार नाही.
– उदय तारदाळकर (अर्थतज्ञ) मो.:9920805822.
“सीकेपी बॅंक ग्राहक बचाव समिती’
सीकेपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेकडून टाकण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ठेवीदारांमध्ये घबराट पसरली आहे. त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी या बॅंकेतील ठेवीदार श्रीधर खानोलकर यांच्या पुढाकाराने ‘सीकेपी बॅंक ग्राहक बचाव समिती’ स्थापन करण्यात आली आहे. बॅंकेच्या प्रत्येक शाखेतील पाच ठेवीदारांनी पुढाकार घेऊन त्या शाखेतील सर्व ठेवीदारांना संघटित करावे अशी समितीची अपेक्षा आहे. बॅंकेला आर्थिक डबघाईला आणणाऱ्या संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची तसेच बॅंकेच्या कर्जबुजव्यांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणीही या समितीने केली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्कः श्रीधर खानोलकरः 9869449293, बबन नाक्तीः 9664450251, सिद्धिविनायक बडसावलेः 9869643919, तेजस गोखलेः 9819434998

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s