कोण आहे अस्सल पार्लेकर? (मे)

पार्ल्यातल्या संस्था, थिएटर्स, शाळा, भाजीमार्केट, दुकानं, झाडं, रस्ते(त्यावरच्या खड्डयांसकट) आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे दर पाचदहा पावलागणिक भेटणारी ओळखीची माणसं, या सगळयाशी पार्लेकरांची नाळ जोडलेली आहे. कुठेतरी वाचल्याचं आठवतंय ‘ज्याने पार्लं सोडायचं धैर्य दाखवलं, त्याला हे जग सोडतानाही भिती वाटणार नाही.’ यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तर हे गाव सोडून दुसरीकडे जाण्याची ज्याला कधी गरजच वाटत नाही तो ‘अस्सल पार्लेकर’ .

समाजकारण,साहित्य,कला,क्रिडा या क्षेत्रातल्या दिग्गजांचं पार्ल्यातलं वास्तव्य, पार्ल्याचा इतिहास, इथल्या वास्तू, संस्था अशा विविध अंगांनी पार्ल्याला ओळखणारा ‘अस्सल पार्लेकर’ आपल्याला शोधायचा आहे आणि त्यासाठी आपण  एक मस्त खेळ पुढिल पाच महिने खेळणार आहोत ‘ कोण आहे अस्सल पार्लेकर?’

खालील प्रश्नांची बरोबर उत्तरे, अचूक पर्याय निवडून त्याची उत्तरे ‘आम्ही पार्लेकर’च्या ऑफिसमध्ये 20 मे पर्यंत पाठवावी. त्यातून निवडलेल्या भाग्यवान विजेत्याला ‘स्पार्क ग्रुप’तर्फे आकर्षक बक्षिस देण्यात येईल. मे महिन्याच्या ‘अस्सल पार्लेकरा’चे नाव पुढल्या अंकात जाहीर केले जाईल.

1. विलेपार्लेस्थानक किती साली बांधण्यात आले?

अ. 1923, ब. 1907, क. 1917, ड. 1912

2. पार्ल्यामधील कोणती हाउसिंग सोसायटी कराचीमधील विस्थापितांनी बांधली?

अ. शुभदा सोसायटी, ब. कुमार सोसायटी, क. निलकमल सोसायटी, ड. साधना सोसायटी

3. रामकृष्ण हॉटेलचं जुनं नाव काय?

अ. मद्रास कॅफे, ब. बाँम्बे कॅफे, क. पार्लेटी हाऊस, ड. पार्लेउडुपी हॉटेल

4. खालीलपैकी कुठला राष्ट्रीय नेता टिळक मंदिरात आलेला नाही?

अ. सुभाषचंद्र बोस , ब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क. डॉ. राजेंद्रप्रसाद, ड. सरदार वल्लभभाई पटेल

5. कुठल्या पार्लेकर नाटयकलावंताने नगरसेवकाचे पद भूषविले होते?

6. पार्ल्यातील पहिली रिक्षा कोणाची होती?

7. पार्ल्यातील कामाठीवाडी परिसरात वाढलेला हिंदी सिनेसृष्टीतला सुप्रसिध्द संगीतकार कोण?

अ. सी.रामचंद्र, ब. वसंत देसाई, क. लक्ष्मीकांत, ड. कल्याणजी

8. पार्लेश्वर मंदिरामधली भव्य गणेशमूर्ती घडवणाऱ्या पार्लेकर कलावंताचे नाव काय?

अ. गणपतराव म्हात्रे, ब. करमरकर जगन्नाथ, क. विठ्ठल शानभाग, ड. डी.जी. कुलकर्णी

9. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना खेळलेला पार्लेकर खेळाडू कोण?

अ. अजित पै, ब. अमोल मुजुमदार, क. सुशांत मराठे, ड. चंदू बोर्डे

10. शमी वृक्षाचे झाड पार्ल्यात कुठल्या रस्त्यावर आहे?

यावर आपले मत नोंदवा