टिळक मंदिरात सत्तापालट

जुलै2012 रोजी पार पडलेल्या टिळक मंदिराच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि तत्कालीन कार्यकारिणीतील अंतर्गत मतभेद उघड झाले. पुलंच्या साहित्यावरील स्वामित्त्वहक्कासंबंधीचा वाद, गुंतवणूक शाखेच्या सभासदांचे राजीनामे, अपंग पुनर्वसन केंद्राच्या पालकसभेच्या वेळी झालेला वाद, आपापसातील विसंवाद अशा अनेक बाबींवरून सभेत गदारोळ उठला. याच दिवशी स्वीकृत कार्यवाह स्मिता पुराणिक यांचा कार्यकाल संपुष्टात आला. दरम्यान कार्यकारिणीत मांडण्यात आलेल्या अविश्वासाच्या ठरावानंतर मोहन करंदीकर यांनी संघकार्यवाह पदाचा राजीनामा दिला. अखेर बहुसंख्य सभासदांच्या मागणीनुसार 15 डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा भरविण्यात आली. त्यातील ठरावानुसार कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आणि टिळक मंदिराच्या इतिहासात प्रथमच मुदतपूर्व निवडणुका घेण्याची वेळ आली. ‘आम्ही पार्लेकर’ने वेळोवेळी या सर्व घडामोडींचा आढावा घेतला.

7 एप्रिल 2013 रोजी या निवडणुका झाल्या. फक्त टिळक मंदिराच्या सभासदांचेच नव्हे तर संपूर्ण पार्ल्याचे लक्ष या निवडणुकांकडे लागले होते. कार्यकारी मंडळाच्या 15 जागांसाठी तब्बल 43 उमेदवार उभे होते तर कार्यवाहपदाच्या दोन जागांसाठी पाच उमेदवार उत्सुक होते. रविवारचा दिवस असूनही सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत 706 अशा विक्रमी संख्येत मतदारांनी आपली मते नोंदवली.

टिळक मंदिरात अनेक वर्षांपासून कार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळणारे शशी गानु यांच्या पाठिंब्याने तयार झालेले पॅनल भरघोस मतांनी निवडून आले. त्यांच्या पॅनलमधील 15 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांवर पार्लेकरांनी पसंतीची मोहोर उमटवली. गेल्या निवडणुकीप्रमाणेच या वेळीही नीला रवींद्र यांना सर्वाधिक म्हणजे 530 मते मिळाली.

या निकालावर नजर फिरवली असता असे लक्षात येते की पार्लेकरांना टिळक मंदिराबद्दल आस्था आहे आणि संस्थेचे कामकाज सांभाळणाऱ्या कार्यकारिणीकडून खूप अपेक्षा आहेत. मागील कार्यकारिणीकडून या अपेक्षांची पूर्तता न झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे मतदारराजाने पाठ फिरवली आणि सत्तापालट घडवून आणला. संस्थेची वाटचाल पूर्वीप्रमाणेच जोमाने सुरू राहावी, बदलत्या काळानुरूप नवे उपक्रम हाती घेतले जावेत आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी एकदिलाने संघाचे कार्य सुरू ठेवावे हीच त्यांची इच्छा आहे हे या निकालावरून स्पष्ट होते.

नवनिर्वाचित कार्यकारिणीला सर्व पार्लेकरांच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा!

निवडून आलेल्या कार्यकारिणीची नावे आणि शाखावाटप खालीलप्रमाणे

 

संघ कार्यवाह व कार्यकारी मंडळ सदस्य 2013-16
कार्याध्यक्ष डॉ. पांडूरंग हरी वैद्य
कार्योपाध्यक्ष प्रभाकर ठोसर
कोषाध्यक्ष श्रीकांत गजानन जोशी
संघकार्यवाह पद्मजा जोग
संघकार्यवाह नंदकुमार आचार्य

 

कार्यकारी मंडळ सदस्याचे नाव शाखा
नीला भिडे माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखा
लीना विश्वास बर्वे मृणालिनी काळे बालसंगोपन केंद्र
रश्मी फडणवीस दिलासा
गजानन केळकर श्री.वा. फाटक ग्रंथसंग्रहालय
अंजली ठोसर डॉ. कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र
रामकृष्ण पांडूरंग मालशे क्रीडा शाखा
सुरेश बर्वे इमारत शाखा
विभावरी सहस्त्रबुध्दे विद्या विकास शाखा
मुकुंद सराफ नागरिक दक्षता / प्रचार शाखा
धनंजय गोखले कै. शरद विनायक साठये वैद्यकीय केंद्र
रत्नाकर खरे माहिती तंत्रज्ञान शाखा
आलोक हर्डीकर कु. कृष्णाबाई लिमये व्यायाम शाळा
उदय जोशी आनंद धाम (वृध्दाश्रम)
प्रमोद वर्तक इमारत शाखा
संदीप दहिसरकर युवा मंच

”संस्थेच्या सध्याच्या इमारतीची पुनर्बांधणी आणि ऑटिस्टिक मुलांसाठी शाळा/वसतीगृह हे विषय प्राधान्याने हाती घ्यायचे आहेत. इमारतीचे काम होऊन अधिक जागा उपलब्ध झाल्याशिवाय संस्थेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपक्रमांचाही आता विचार करणे कठीण आहे. समस्त पार्लेकरांचा आर्थिक आणि मानसिक पाठिंबा यासाठी आवश्यक आहे.”

– पद्मजा जोग व नंदकुमार आचार्य

(संघ कार्यवाह)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s